24 जानेवारी : अभिनेता शाहरुख खानला पाहण्यासाठी स्टेशनवर उसळलेल्या गर्दी एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता अॅडव्होकेट आभा सिंग यांनी शाहरुख खानवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये.
रईस सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मुंबई ते दिल्ली एक्स्प्रेसने प्रवास केला. यावेळी त्याला पाहण्याची चाहत्यांची तोबागर्दी झाली. यात एका एका जणांचा मृत्यू झाला. अॅडव्होकेट आभा सिंग यांनी रेल्वेमंच्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहुन अभिनेता शाहरुख खान आणि रेल्वे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केलीय.
या पत्रानुसार, शाहरुख खान हा बेकायदेशीरपणे रेल्वेस्टेशनवर आपल्या फिल्मचं प्रमोशन करत होता आणि त्याला रेल्वेचे अधिकाऱ्यांनीही हरकत घेतली नाही. ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने प्रवास करतानाच त्याच्या पीआर टीमने प्रत्येक स्टेशनवर गर्दी केली होती. ज्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे वडोदरा पोलिसांना सांगून एफआयआर दाखल करावा ही मागणी आभा सिंग यांनी केलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.