Home /News /news /

तुरुंबव मारहाण प्रकरणी भास्कर जाधव-निलेश राणे आमनेसामने

तुरुंबव मारहाण प्रकरणी भास्कर जाधव-निलेश राणे आमनेसामने

b jadhav n rane25 मे : चिपळूण तालुक्यातील तुरुंबव मारहाण प्रकरणी पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलंय. भास्कर जाधव आणि निलेश राणे पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकले आहे. एकेकाळी मित्र पक्ष असणार्‍या दोन्ही पक्षातील नेत्यांचा राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या भावासह 26 जणांविरोधात सावर्डे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुरुंबव ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांसह ग्रामस्थांची सुरू असलेली बैठक उधळून लावून मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला यामध्ये 8 जण जखमी झाले होते. तुरंबव येथील मारहाणीनंतर राजकीय वाद उफाळूण आलाय. भास्कर जाधव यांचा मुलगा आणि भाऊ या मारहाणीमध्ये असल्यानं याल राजकीय रंग चढलाय. तर भास्कर जाधव यांच्या भाऊ सुनील जाधव यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर तसंच जावई अमीद शिंदे याच्यावर ऍट्रासिटी दाखल करण्यात आलेय. हा घरगुती वाद असल्याच भास्कर जाधव यांनी म्हटलंय.

मात्र, हाणामारीच्या या वादात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी उडी घेतलीये. तुरंबव येथे झालेली मारहाण ही घरगुती वादातून झाली नसल्याचं माजी खासदार निलश राणे यांनी म्हटलंय. भास्कर जाधव हे आम्हाला नेहमी संस्कृतीच शिकवतात. लोकांवर अमानुष हल्ला करण्याची ही कुठली संस्कृती? त्यांच्या मुलावर ऍट्रासिटी दाखल केली गेलीय हीच त्यांची संस्कृती आहे का ?, त्यांनी घरात गुंड तयार केलेत. वाळूच्या पैशावर त्यांचं घर चालतंय अशी टीका निलेश राणे यांनी केलीये. भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्यातील वादामुळे रत्नागिरी पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण झालेय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Bhaskar jadhav, Nilesh rane, चिपळूण, भास्कर जाधव

पुढील बातम्या