मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'ती' बोट लष्कर-ए-तोयबाची, नौदलतळ होतं टार्गेट !

'ती' बोट लष्कर-ए-तोयबाची, नौदलतळ होतं टार्गेट !

Pakistan Boat06 जानेवारी : भारतात 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्यासाठी पोरबंदरच्या समुद्रमार्गे दाखल झालेली ती बोट दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबानं पाठवल्याची खळबळजनक माहिती सूत्रांकडून मिळालीये. या बोटीविषयी महत्त्वाची माहिती सीएनएन-आयबीएनच्या हाती लागली आहे. पोरबंदरमधलं नौदलतळ हे या अतिरेक्याचं प्रमुख लक्ष्य होतं असंही उजेडात आलंय.

31 डिसेंबरच्या रात्री 26/11 सारखा हल्ला करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानहून गुजरातकडे एक बोट रवाना झाली होती. मात्र, या बोटीच्या संशयास्पद हालचालीने सतर्क तटरक्षक दलाने तिला अडवलं. बोट अडवताच बोटीवरील चौघांनी बोट पेटवून दिली. पेटवून दिल्यानंतर बोटीचा स्फोट झाला आणि ती उद्‌ध्वस्त झाली. ही बोट पाकिस्तानचीच होती की नाही यावरून बराच वाद रंगला होता. पाकिस्ताने ही बोट आमची असल्याचा दावा फेटाळून लावला होता. पण आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या माहितीमुळे धक्कादायक बाब समोर आलीये. ही बोट दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाने पाठवली होती. पोरबंदरमधलं नौदलतळ हे या अतिरेक्याचं प्रमुख लक्ष्य होतं. हा कट घडवून आणण्यासाठी लष्कर-ए-तोएबानं बोटीवरच्या चौघांना भरपूर पैसा दिला होता, अशीही माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच बोटीवरचे हे चार अतिरेकी पाकिस्तानी सैन्य आणि मरीन अधिकार्‍यांच्याही सातत्यानं संपर्कात होते, असंही तपासात पुढे आलंय. पाकिस्तानात असा काहीतरी कट रचला जातोय, याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेला पंधरा दिवस आधीच मिळाली होती. पूर्वसूचना मिळूनही नौदलानं कारवाई का केली नाही, याची अंतर्गत चौकशीही सुरू झाल्याची माहिती मिळतं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: India, Pakistan, Terrorism, गुजरात