मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'तिसर्‍या आघाडीला राष्ट्रीय पक्षांची सोबत लागेलच'

'तिसर्‍या आघाडीला राष्ट्रीय पक्षांची सोबत लागेलच'

  sharad pawar on aghadi12 जून : केंद्रात तिसर्‍या आघाडीच्या मोर्चेबांधणीला जोर आलाय. असं असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी तिसर्‍या आघाडीबाबत भाकित केलंय. 2014 च्या निवडणुकीत तिसर्‍या आघाडीला संधी मिळाली तरी त्यांना राष्ट्रीय पक्षांची सोबत घ्यावीच लागेल असं मत पवारांनी व्यक्त केलं. केंद्रातील लोकशाही आघाडी सरकार ला स्पष्ट बहूमत नाही. त्यामुळे यासरकारची अवस्था दोलायमानं झालीय अशी टीकाही शरद पवार यांनी केली. यूपीए सरकार दोलायमान असले तरी मध्यावधी निवडणुकांची शक्यताही पवार यांनी फेटाळून लावली.

  कोणती तिसरी आघाडी ? - लालूप्रसाद यादव

  कोणती तिसरी आघाडी ? अशा शब्दात लालूप्रसाद यादव यांनी तिसर्‍या आघाडीवर टीका केली आहे. आधीप्रमाणेच आम्ही युपीएसोबत किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करू असँ लालूप्रसाद यादव म्हणाले. नितीश कुमार लालकृष्ण अडवाणींचे पोपट असल्याची टीकाही त्यांनी केली.

   तिसर्‍या आघाडीसमोरच्या अडचणी

  - काँग्रेस किंवा भाजपया दोन राष्ट्रीय पक्षांपैकी एकाच्या पाठिंब्याशिवाय तिसर्‍या आघाडीचं सरकार स्थापन होऊ शकत नाही.

  - एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे ममता बॅनर्जी आणि डावे पक्ष कधीही एकत्र येणार नाही

  - त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातले प्रतिस्पर्धी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे दोन पक्षही एकत्र येणार नाहीत

  - पण, समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्ष यापैकी एकाची साथ असल्याशिवाय तिसर्‍या आघाडीचं सरकार येणं कठीण आहे.

  - या संभाव्य तिसर्‍या आघाडीत मुलायम सिंह यादव,जयललिता, एच. डी. देवेगौडा, मायावती असे अनेक नेते पंतप्रधान पदाची इच्चा बाळगून आहेत.

  - तिसर्‍या आघाडीतल्या पक्षांची ताकत ही त्या-त्या राज्यांपूर्ती मर्यादित आहे.

  - तिसर्‍या आघाडीचा इतिहास बघता या आघाडीतले पक्ष हे संधीसाधू राजकारण करतात आणि त्यांच्यात राष्ट्रीय व्यापक दृष्टीकोनाचा अभाव असतो, हे स्पष्ट होतं.

  - तसंच तिसरी आघाडी देशाला धोरणात्मक पर्याय देऊ शकलेली नाही

  First published:
  top videos