मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीची सत्ता

ËÖêêßÖêÖßÖÖêpy

02 ऑगस्ट : सांगलीमधल्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली आहे. भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवत 19 पैकी 18 जागांवर आर. आर. पाटील पॅनलने विजय मिळवला आहे.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी सत्ता कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. भाजपच्या पराभव हा खासदार संजय पाटील यांना मोठा धक्का मानला जातं आहे. निवडणुकीत पराजय झाल्यानंतर जनतेचा कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी दिली आहे. तर कोणताही जल्लोष न करता आर. आर. पाटील पॅनलने विजयी सभा घेऊन दिवंगत आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांचीही जोरदार तोडफोड करण्यात आली. त्यामुळे कालच्या घटनेच्या निषेधार्थ म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीनं आज तासगावमध्ये बंद पुकारला आहे. भाजपच्या खासदारांना पराभव समोर दिसत असल्यानं त्यांनी आपल्या कुटुंबावर हल्ला केला असा आरोप राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी काल केला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: BJP, NCP, Rrpatil, Sangli, Tasagao, आर आर पाटील, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, सांगली

पुढील बातम्या