Home /News /news /

तावडे दहावीला डमी बसवून पास झाले- नवाब मलिक

तावडे दहावीला डमी बसवून पास झाले- नवाब मलिक

navab malik4409 जुलै : शिक्षणमंत्री बोगस मंत्री आहे. तावडे 12 वी पास आहे की नाही अशी शंका येतेय. तावडे यांनी डमी उमेदवार बसवून 10 वीची परीक्षा दिली असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शिक्षणाबद्दलचा वाद थांबायला तयार नाही. आधी तावडेंच्या पदवीच्या वैधतेबद्दल वाद-विवाद झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या 10 वीच्या परीक्षेसंबंधीच प्रश्न उपस्थित केलाय. तावडे स्वत: बीई इंजिनिअर म्हणवून घेतायत पण ते 12 वी पास झाले नाही. ज्ञानेश्वर विद्यापीठ बोगस विद्यार्थ्यांना पदवी देत. तावडे यांनी 10 वीच्या परीक्षेत डमी विद्यार्थी बसवला होता असा आरोप मलिक यांनी केलाय. तर मलिक यांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारण सोडेन नाही तर त्यांनी राजकारण सोडावं असं आव्हान तावडे यांनी दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Vinod tawade, नवाब मलिक, पदवी, राष्ट्रवादी, विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री

पुढील बातम्या