23 ऑगस्ट : सोलापुरात पंतप्रधानांच्या कार्यक्रमात झालेला गोंधळ हा पूर्वनियोजित होता आणि असा प्रकार पुन्हा घडणार नाही असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याखेरीज आपण पुन्हा एका व्यासपीठावर येणार नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.
सोलापुरात झालेल्या घटनेवर नाराज असल्यामुळे आपण नागपूरच्या कार्यक्रमात गैरहजर राहिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. तसंच, सोलापुरात मोदींनी दिलेल्या वागणुकीवर आपण नाराज असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
सोलापूरमध्ये पुणे-सोलापूर रस्त्याच्या चौपदरीकरण आणि रायचून ट्रान्शमिशन लाईनचंही उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं. त्यावेळी मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाच्या जयघोष केला त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषण आटोपत घ्यावं लागलं.
दोनच दिवसांपूर्वी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं पण या कार्यक्रमावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाषणात बोलू न देणं हा राज्याचा अपमान आहे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलंय.
+++++++++++++++++++++++++
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.