मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

तब्बल 19 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

तब्बल 19 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

konkan accident2705 मे :   रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल १९ तासांनी कोकण रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आज सकाळपासून या ट्रॅकवर वाहतुकीला सुरुवात झाली.

 कोकण रेल्वेचा ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचा संदेश पहाटे 4.07 मिनिटांनी देण्यात आल्यानंतर, पहाटे पाचच्या सुमारास एक मालगाडी तिथून सोडण्यात आली. त्यानंतर हजरत निजामुद्दीन - त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेस सोडण्यात आली. पाठोपाठ CST -मंगलोर एक्सप्रेस रवाना झाली आहे.

दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला नागोठणेजवळ काल सकाळी भीषण अपघात झाला होता. या पॅसेंजर ट्रेनचे चार डबे रुळावरुन घसरल्याने 22 प्रवाशांना जीव गमवावा लागला, तर 189 जण जखमी झालेत. या अपघातामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक रविवारी सकाळपासून पूर्णपणे ठप्प पडली होती. या मार्गावरील काही गाड्या अन्य मार्गांवर वळवण्यात आल्या होत्या. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे ऊन्हाळी सुट्टीत कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचे हाल झाले होते.

रेल्वेच्या पथकाने अथक मेहनत रात्री अपघातग्रस्त गाडीचे डबे रुळावरुन हटवले. यानंतर संपूर्ण ट्रॅकची तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. ट्रॅक सुरक्षित असल्याचे स्पष्ट होताच सकाळी पाचच्या सुमारास कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत होणं शक्य झालं.

दरम्यान, कोकण रेल्वेच्या अपघातात जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रोह्यातल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ भेट घेतलीत आणि विचारपूस केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री सुनील तटकरेही आहेत. मुख्यमंत्री अपघाताच्या ठिकाणालाही भेट देणार आहेत.

First published:

Tags: Railway, Railway accident, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर

पुढील बातम्या