डोंबिवली - 26 मे :प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटानं डोंबिवली हादरली...स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दीड किलो मीटर परिसरातल्या इमारतीच्या काचा फुटल्या..मार्जिन एरियामध्ये रिएक्टर उभारून नियमांची पायमल्ली केल्याचं इथं दिसून आलं. त्यामुळे नियम धाब्यावर बसवल्यानं किती मोठी दुर्घटना होऊ शकते हे या स्फोटानं दिसून आलंय.

सकाळी 11.30 वाजता... डोंबिवली हादरली. प्रोबेस इंटरप्रायझेस कंपनीत स्फोट झाला. बाजूला असणारी हर्बर्ट ब्राऊन फार्मासिटिकल्स आणि लॅबोरेटरी या मोठ्या कंपनीचंही मोठं नुकसान झालंय. या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झालाय. तर 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटात एकूण 67 जण जखमी झाले असुन त्यांच्यावर डोंबिवलीच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
स्फोटाची तीव्रता इतकी होती की दीड किलो मीटरच्या परिसरातल्या इमारतीच्या काचा फुटल्या. वाहनांची आणि घरांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, डोंबिवलीत 24 तास मदतकार्य सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली.
मार्जिन एरियाचा वापर करुन उभारलेल्या बॉयलरचा हा स्फोट झाल्यानं ही घटना घडलीय. कंपन्या उभ्या राहतायेत त्या नियमांना फाटा देऊनचं..त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाला तर कसा विध्वंस होतो. हे डोंबिवलीत झालेल्या भस्मसातानं स्पष्ट झालं. त्यामुळे याला जबाबदार एमआयडीसी आहे का ?असाही सवाल निर्माण झालाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.