Home /News /news /

डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्यांचं स्थलांतर करणार -देसाई

डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्यांचं स्थलांतर करणार -देसाई

desaiडोंबिवली -26 मे : डोंबिवलीमध्ये झालेल्या केमिकल स्फोटानंतर सरकारला खडबडून जाग आलीये. डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्यांचं स्थलांतर करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलीये.

याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे आणि लवकरच धोरण ठरवण्यात येईल असं सुभाष देसाई यांनी सांगितलंय. सुभाष देसाई यांनी आज डोंबिवलीतील स्फोटाच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसंच जखमींची विचारपूसही केली.

तर, प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोट अतिशय भयानक आहे आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. अशाप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही आणि नागरिकांचं आणि मालमत्तेचं रक्षण होईल याची काळजी राज्य सरकार घेईल असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. याबाबत मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्रींशी चर्चा केल्याचं शिंदेंनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Dombivali, Mumbai, केमिकल कंपनी, डोंबिवली, सुभाष देसाई

पुढील बातम्या