Home /News /news /

ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी !

ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी !

Congress NCp21 जानेवारी : ठाणे महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब झालंय. काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची बैठक पार पडली. जागावाटपावर सकारात्मक चर्चा झाली असून वरिष्ठांकडून फॅार्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्यावर आघाडीची घोषणा करू असं नारायण राणे यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेच्या आघाडीबाबत नारायण राणे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक पार पडली. आम्हाला जेवढ्या जागा पाहिजे आहेत तेवढ्या जागा राष्ट्रवादीने दिल्या आहेत. वरिष्ठांकडून फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्यावर आघाडीची घोषणा करू अशी माहिती राणे यांनी दिली. संजय निरूपम आणि कामत यांच्यातील मतभेद मिटवावेत त्यासाठी मी प्रयत्न केले. मी संजय निरूपम यांच्याशी बोललो. हा आमच्या पक्षाचा अंतर्गत वाद आहे. तो आम्ही संपवू असंही राणे म्हणाले. यावेळी राणे यांनी भाजप आणि सेनेच्या युतीच्या चर्चेवर सडकून टीका केली. रावसाहेब दानवेंनी वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. दुसऱ्यांनी 500-1000 नोटा बदलल्या तर त्यांच्यावर खटले दाखल होता. मग दानवेंवर का नाही. दानवेंनी आतापर्यंत किती नोटा बदलून दिल्या याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही राणे यांनी केली. उद्धव ठाकरेंची मजबुरी आहे. सत्तेसाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी बांधील आहेत. युती होईल असं वाटत नाही असंही राण म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Congress, Thane, काँग्रेस, जितेंद्र आव्हाड, ठाणे, नारायण राणे, राष्ट्रवादी

पुढील बातम्या