Home /News /news /

टीम इंडिया 'अजिंक्यच', झिम्बाब्वे 'हरा-रे' !

टीम इंडिया 'अजिंक्यच', झिम्बाब्वे 'हरा-रे' !

rayudu_630010 जुलै : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे विरूद्ध हरारेच्या मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाने वन डे सामन्यात विजयी सलामी दिलीये. अटीतटीच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 4 धावांनी पराभव केलाय. भारताने दिलेल्या 256 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणारी झिम्बाब्वे टीम 251 धावांवर गारद झाली.

भारताने पहिली बॅटिंग करत 256 धावाचा लक्ष्य उभारलं खरं भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. अवघ्या 87 धावांवर 5 खेळाडू तंबूत परतले होते. अंबाती रायडू आणि स्टुअर्ट बिन्नीने टीम इंडियाची बाजू सावरत भक्कम स्कोअर उभा केला. अंबाती रायडूने नाबाद 124 धावा आणि स्टुअर्ट बिन्नीने 77 धावा केल्या. दोघांच्या महत्वपूर्ण पार्टनशिपमुळे भारताने झिम्बाब्वेला 256 धावाचं आव्हान दिलं. झिम्बाब्वेची सुरुवातही खराब झाली. 150 धावांमध्ये अर्धा संघ तंबूत परतला होता. मात्र, कर्णधार एल्टन चिगुमबुराने झिम्बाब्वे टीमची कमान सांभाळली. मात्र, भारतीय गोलंदाजाच्या भेदक गोलंदाजीपुढे उर्वरीत टीम टीकू शकली नाही. निर्धारीत 50 ओव्हरमध्ये झिम्बावेची टीम 7 विकेटवर 251 धावांवर गारद झाली. पहिल्या वन डेममध्ये भारताने विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Ind vs zim, अजिंक्य, अजिंक्य रहाणे, झिम्बाब्वे, टीम इंडिया

पुढील बातम्या