Home /News /news /

टीएचआर घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडे राजीनामा द्या -मलिक

टीएचआर घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडे राजीनामा द्या -मलिक

मुंबई , 14 जुलै : राज्य सरकारनं 12 हजार कोटींच्या टेंडर घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.navab malik44

मंत्र्यांवर होणार्‍या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला लक्ष्य केलंय. महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे आणि आय सी डी एस आयुक्त विनिता वेद सिंघल यांनी काही निवडक ठेकेदारांना काम मिळावं म्हणून 12 हजार कोटींचं टेंडर तयार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलंय. टीएचआर घोटाळा 12 हजार कोटीपेक्षा अधिक मोठा आहे असा आरोपही मलिक यांनी केलाय. काही ठेकेदारासाठी जीआर बदलण्यात आला, महिला आणि बालकल्याण विभागाच्या आयुक्त विनिता वेद सिंघलची बदली झाली असताना त्यांची बदली कुणी थांबवली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशी करावी,आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणीही मलिक यांनी केली आहे.

गेल्या अधिवेशनापूर्वी विनोद तावडे, बबनराव लोणीकर यांच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँगेसला पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करण्याची आयती संधी मिळालीय. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय.

परंतु, महिला बालकल्याण विभागाच्या सर्व अटी आणि शर्ती उच्च न्यायालयानं मान्य केल्या आहेत असा दावा महिला बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल यांनी पत्रकातून केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Pankaja munde, नवाब मलिक, पंकजा मुंडे

पुढील बातम्या