Home /News /news /

झोपडीत सापडलेले 3 कोटी कोल्हापूरचे बिल्डर झुंजार सरनोबत यांचे !

झोपडीत सापडलेले 3 कोटी कोल्हापूरचे बिल्डर झुंजार सरनोबत यांचे !

miraj_moneyसांगली - 17 मार्च : मिरज इथं 11 मार्चला पोलिसांनी एका झोपडीवर छापा टाकला होता, त्यात 3 कोटी 11 लाख रुपये हस्तगत करण्यात आले होते. हा पैसा कोल्हापुरातले बिल्डर झुंजार सरनोबत यांचा असल्याचे उघड झालंय. सरनोबत यांनी आपले पैसे चोरीला गेल्याची तक्रार कोडोली पोलीस ठाण्यात दिली आहे.

तर ज्या ठिकाणाहून ही चोरी झाली आहे, त्या कोल्हापुरातल्या वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या अकाउंट विभागातून आणखी 1 कोटी 31 लाख 11 हजार रुपये जप्त करण्यात आलेत. त्यामुळे वारणा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही रक्कम पन्हाळा तालुक्यातल्या मैनुद्दीन अबुबकर मुल्ला यानं ठेवल्याचंही समोर आलंय. त्याच्याकडे ही रक्कम कुठून आली हा तपास मिरज पोलीस करत होते, त्यावेळी घरामध्ये ही 3 कोटींची रक्कम सापडली होती. आता पोलिसांनी वारणा विभाग शिक्षण मंडळाचा अकाउंट विभाग सील केलाय.

दरम्यान, झुंजार सरनोबत यांच्याकडे एवढ्या प्रमाणावर ही रक्कम कुठून आली ?, त्यांनी ही रक्कम वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या कार्यालयात का ठेवली, ही रक्कम गेल्या किती दिवसांपासून तिथं ठेवली होती. पैसे चोरीला गेल्यानंतर तक्रार द्यायला एवढा वेळ का लागला असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: 3 कोटी, Kolhapur, Sangali, कोल्हापूर, झुंजार सरनोबत, झोपडी, बिल्डर, मैनुद्दीन अबुबकर मुल्ला

पुढील बातम्या