Home /News /news /

'झी' च्या संपादकांना पोलीस कोठडी

'झी' च्या संपादकांना पोलीस कोठडी

28 नोव्हेंबर 2012झी न्यूजच्या दोन वरिष्ठ संपादकांना आज दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना काल अटक करण्यात आली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणार्‍या घटनेच्या 19व्या कलमाचा गैरवापर कुणाचाही छळ करण्यासाठी केला जाऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं. काँग्रेसचे खासदार नविन जिंदाल यांच्या उद्योगसमूहाने तक्रार केलीये की झीच्या या दोन संपादकांनी कोळसा घोटाळ्यातली बातमी दडवण्याठी 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र झी समूहाने आरोप केलाय की पत्रकारितेचा गळा दाबण्यासाठी रचण्यात आलेला हा राजकीय कट आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर 45 दिवसांनी अटक का झाली, असा सवालही त्यांनी विचारलाय. दरम्यान, पोलिसांनी आज झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनाही चौकशीसाठी नोटीस पाठवली.

पुढे वाचा ...

28 नोव्हेंबर 2012

झी न्यूजच्या दोन वरिष्ठ संपादकांना आज दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना काल अटक करण्यात आली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणार्‍या घटनेच्या 19व्या कलमाचा गैरवापर कुणाचाही छळ करण्यासाठी केला जाऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं. काँग्रेसचे खासदार नविन जिंदाल यांच्या उद्योगसमूहाने तक्रार केलीये की झीच्या या दोन संपादकांनी कोळसा घोटाळ्यातली बातमी दडवण्याठी 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र झी समूहाने आरोप केलाय की पत्रकारितेचा गळा दाबण्यासाठी रचण्यात आलेला हा राजकीय कट आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर 45 दिवसांनी अटक का झाली, असा सवालही त्यांनी विचारलाय. दरम्यान, पोलिसांनी आज झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनाही चौकशीसाठी नोटीस पाठवली.

First published:

पुढील बातम्या