25 सप्टेंबर : डॉलरच्या तुलनेत रुपयाची झाल्या घसरणीमुळे अजूनही बाजारावर आर्थिक संकटाची ढगं कायम आहे. यासाठीच शून्य टक्के व्याजदर योजना रिझर्व्ह बँकेनं रद्द केली आहे.
ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्यामुळे सणासुदीच्या काळात खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा योजनांमुळे वस्तुच्या किंमतीमध्ये पारदर्शकता राहत नाही. परिणामी त्याचा तोटा ग्राहकांनाच होतो, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्ट फोन अशा अनेक वस्तू, शून्य टक्के व्याजदरात देणार्या स्कीम्स सध्या बाजारात आहेत. एकाच वेळी मोठी रक्कम न भरता 6 ते 12 महिन्यात ती टप्प्या-टप्प्यानं देता येत असल्यानं अनेक ग्राहक अशा स्किमकडे आकर्षित होतात. पण, यातून ग्राहकांची होणारी लुबाडणूक रोखण्यासाठी बँकेनं हा निर्णय घेताला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.