14 जून : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे क्रिकेट स्टेडियमवर झालेला दुसरा सामना जिंकत भारताने मालिकाही खिशात घातलीये. तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-0 असा विजय मिळवलाय.
दुसर्या एकदिवसीय सामन्यात सर्वप्रथम गोलंदाजी करताना भारताने झिम्बाब्वेचे सर्व फलंदाज बाद करून त्यांना 127 धावांवर रोखलं.
तर भारताने दोन गडी गमावत 127 धावांचं लक्ष्य सहजपणे पार करून हा सामना जिंकला.भारताकडून येजुवेंद्र चहलने तीन बळी मिळवले. तर धवल कुलकर्णी आणि बरिंदर सराने दोन बळी मिऴवत त्याला सुरेख साथ दिली. याआधीच्या पहिल्या वनडेतही भारताने शानदार विजयी सलामी दिली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.