03 ऑगस्ट : झिम्बाब्वे दौर्यात भारतानं निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. पाच वन डे मॅचची सीरिज जिंकत भारतानं झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिलाय. पाचव्या वन डे मॅचमध्ये भारतानं झिम्बाब्वेवर 7 विकेटनं मात केली. पहिली बॅटिंग करणारी झिम्बाब्वे टीम 163 रन्सवर ऑलआऊट झाली.
विजयाचे हे आव्हान भारतानं 34व्या ओव्हरमध्येच पार केलं. अजिंक्य रहाणेनं शानदार हाफसेंच्युरी ठोकली. तर मॅचमध्ये 6 विकेट घेणारा अमित मिश्रा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.
या सीरिजमध्ये अमित मिश्रानं तब्बल 18 विकेट घेतल्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाने कोणत्याही टीमला त्यांच्या मायभूमीत व्हाईटवॉश दिला नव्हता पण आजही ऐतिहासिक कामगिरी भारतीय टीम पार पाडलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, झिम्बाब्वे, भारत