25 जानेवारी : रसायनशास्त्रात केलेल्या अतुलनिय कामगिरी करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. माशेलकर यांनी रसायनशास्त्र विषयात केलेल्या बहुमोल कामगिरीची दखल सरकारने घेतलीय. सरकारनं अजून पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केलेली नाही. पण, डॉ. माशेलकर यांनीच पद्मविभूषण पुरस्काराबद्दलची माहिती दिलेली आहे.
तसंच माशेलकर यांनी हळद आणि इतर भारतीय पेटंट्ससाठी लढून तो लढा यशस्वी करुन दाखवला होता. त्यामुळे जगात भारतीय वस्तूंची मक्तेदारी कायम राहिली. या लढाईत डॉ. माशेलकर यांची महत्त्वाची भूमिका होती. डॉ. माशेलकर यांनी मुंबईत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं. आणि विज्ञान क्षेत्रात भारताला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं.
- रसायनसास्त्रातले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ
- मुंबईमध्ये प्रतिकूल परिस्थिती पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं
- भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञानविषयक धोरणांना दिशा देण्यात मोलाचं योगदान
- हळद, कडुलिंब, बासमती तांदूळ यांचे पेटंट्स भारताला मिळवून दिली
- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला (NCL) आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं
- सेंटर फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR)चे महासंचालक होते
- पॉलिमर विज्ञान या क्षेत्रात मोठं संशोधन केलं
- पद्मश्री, पद्मभूषण आणि 50हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार
First published:
top videos
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.