मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जेएनयू प्रकरण: उमर खालिद, अनिर्बन आले पोलिसांना शरण

जेएनयू प्रकरण: उमर खालिद, अनिर्बन आले पोलिसांना शरण

Umar Khalid screenshot

दिल्ली – 24 फेब्रुवारी : देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य हे दिल्ली पोलिसांना काल (मंगळवारी) रात्री उशीरा शरण आलं. उमर आणि अनिर्बन यांनी पोलिसांना शरण यावं असा आदेश दिल्ली हायकोर्टाने काल दिला होता. या दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अटक टाळता येईल असा कोणताही दिलासा दिल्ली हायकोर्टाकडून मिळाला नसल्याचे पाहून या दोघांनी शरण येण्याचा निर्णय घेतला.

जेएनयूत देशविरोधी घोषणा दिल्याची घटना घडल्यानंतर कन्हैया कुमारसह त्याच्या अन्य पाच सहकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कन्हैया कुमारच्या अटकेनंतर उमर आणि इतर चारजण फरार होते. मात्र रविवारी रात्री ते पुन्हा कॅम्पसमध्ये परतले. त्यानंतर शरण येण्यापूर्वी मंगळवारी रात्री खालिद आणि अनिर्बन यांना एका सुरक्षा वाहनातून जेएनयू कॅम्पसच्या बाहेर आणलं गेलं. त्यानंतर ते पोलिसांना शरण आलं. पहाटे चारच्या सुमाराला पोलिसांनी त्यांना अधिकृतपणे अटक केली. या दोघांवरही देशविरोधी घोषणा केरणे आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी सांगितलं की खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य पोलिसांना शरण आले आहेत. परंतु त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे, याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. या दोघांना आज पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, अषुतोष कुमार, रामा नागा, अनंत प्रकाश हे तीनही विद्यार्थी अद्याप फरार आहेत.

दरम्यान, देशद्रोहाच्या आरोपात अटकेत असलेला कन्हैयालाल कुमारच्या जामिनावर दिल्ली हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत दिल्ली पोलिसांनी स्टेटस रिपोर्ट सादर करावा असे आदेश हायकोर्टाने दिले. देशद्रोहाच्या घोषणा दिल्या नसल्याचं याआधीच कन्हैयाने स्पष्ट केलं आहे. मात्र आपल्याकडे त्यासंदर्भात ठोस पुरावे असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर कोर्ट काय निर्णय देते. याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यात आता उमर खालिदलाही पोलिसांनी अटक केली आहे.

त्याचबरोबर, आता परिस्थिती बदलली असल्याने कन्हैयाकुमार आणि इतर सहकार्‍यांना जामीन देण्यास आमचा विरोध असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी सांगितले. जामीन दिला गेला, तर पोलीस तपासावर त्याचा परिणाम होईल असेही त्यांनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: Abvp, JNU, Protest, Rajnath singh, अभाविप, राजनाथ सिंह