मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जेएनयू प्रकरणी वकिलांचा पुन्हा राडा, पत्रकारांनाही मारहाण

जेएनयू प्रकरणी वकिलांचा पुन्हा राडा, पत्रकारांनाही मारहाण

lower323नवी दिल्ली - 17 फेब्रुवारी : जेएनयूच्या वादावर आज पुन्हा एकदा पटियाळा कोर्टाबाहेर वकिलांनी राडा घातला. वकिलांनी आज पुन्हा पत्रकारांवर हल्ला चढवला. फर्स्टपोस्टचे पत्रकार तारीक अन्वर यांच्यासह इतर पत्रकारांना वकिलांनी मारहाण केली. कोर्ट परिसरातल्या एका ओबी व्हॅनचीही वकिलांनी मोडतोड केली. एवढंच नाहीतर वकिलांनी पत्रकारांवर विटाही फेकल्या.

जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या रिमांडबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टाने स्थगित दिलीये. पटियाला हाऊस कोर्टात ही सुनावणी होणार होती. पटियाला हाऊस कोर्टाच्या आवारात आज पुन्हा एकदा वकिलांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये वकिलांचे दोन गट पडले होते. एक गट हा कन्हैयाकुमाराचा समर्थक होता तर दुसरा गट विरोधात होता. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. वकिलांनी 'वंदे मातरम्'च्या घोषणा दिल्या. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की वकिलांमध्ये हाणामारी सुरू झाली. यामुळे गेट नंबर 2 बंद करावा लागला. कायदा सुव्यवस्थेचं पालन करा असे सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही परिस्थिती चिघळत चालली आहे. काही वकिलांनी पटियाळा कोर्टापासून ते इंडिया गेट सर्कलपर्यंत पदयात्राही काढली होती. या आधी सोमवारीही वकिलांनी कोर्टाबाहेर धुडगूस घातला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Abvp, JNU, Protest, Rajnath singh, अभाविप, वकिल

पुढील बातम्या