मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'जेएनयू'वरुन कोर्टाबाहेर वकिलांचा धुडगूस, विद्यार्थी-पत्रकारांना मारहाण

'जेएनयू'वरुन कोर्टाबाहेर वकिलांचा धुडगूस, विद्यार्थी-पत्रकारांना मारहाण

jnu_patiyala_court3नवी दिल्ली - 15 फेब्रुवारी : जेएनयू प्रकरणावरुन वादंग सुरूच आहे. पटियाला कोर्ट परिसरात जेएनयूचे विद्यार्थी आणि वकिलांमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडाली. वकिलांना भारत माता की जय अशा घोषणा देत विद्यार्थ्यांना मारहाण केलीये. या धुमश्चक्रीत पत्रकारांनाही मारहाण झालीये. भारतात विरोधात घोषणाबाजी करणार्‍या कन्हैया कुमारला आज पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी काही वकिल आणि जेएनयूच्या विद्यार्थ्यांमध्येच मारामारी झाली. या मारहाणीत आयबीएन सेव्हनचे पत्रकार अमित पांडे यांनाही मारहाण झाली. तर सीएनएन आयबीएनच्या पत्रकार मिनाक्षी उप्रेती यांनाही धक्काबुक्की झाली. कन्हैया कुमाराला कोर्टात हजर करण्यात असल्यामुळे त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे वकिलांकडून देशांच्या समर्थनात आणि जेएनयूविरोधात घोषणाबाजी सुरू होती. याच दरम्यान, जेएनयूच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली. काही क्षणातच वकिलांनी एका जेएनयूच्या विद्यार्थ्याला मारहाण केली. नारेबाजी करणारे वकिल भाजपशी निगडीत आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. या धुमश्चक्रीत आयबीएन नेटवर्कसह तिथे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांनाही मारहाण झाली. विशेष म्हणजे, पोलिसांसमोरच वकिलांनी उच्छाद घातला. जेएनयूचे विद्यार्थी समजून जो दिसेल त्याला हे वकील मारहाण करत होते. दरम्यान, कोर्टाच्या परिसरात भाजपचे नेते ओपी शर्मा यांनी आपल्या समर्थकासह एका व्यक्तीला मारहाण केली. हा व्यक्ती मारहाण करून पळून चालला होता आणि तो पाकिस्तानचे नारे लावत होता म्हणून त्याला पकडून मारहाण केली असा दावा शर्मा यांनी केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Abvp, JNU, Protest, Rajnath singh, अभाविप, जेएनयू, पटियाला कोर्ट, वकिल

पुढील बातम्या