मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जेएनयूमध्ये विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ

जेएनयूमध्ये विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ

 JNU STUDENT

14 मार्च : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या वर्षी आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाचं प्रकरण अजून चर्चेत असताना या घटनेमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

मुथुकृष्णन उर्फ रजनी क्रिश हा जेएनयूमध्ये एमफीलचा विद्यार्थी होता. क्रिश गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. क्रिशने दिल्लीच्या मुनिरका विहारमधील रूम नंबर 196ची आतून कडी लावून घेतली होती. संध्याकाळपर्यंत त्याने दरवाजा न उघडल्याने मित्राने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दरवाजा उघडला असता, क्रिश गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.

दरम्यान, जेएनयूमध्ये दोन वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांच्या गटांत संघर्ष सुरू आहे. अभाविप आणि डाव्या संघटनांमधील वादाने गेल्या काही दिवसांपूर्वी हिंसक वळण घेतलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: JNU

पुढील बातम्या