मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जिल्हा परिषदांसाठी छुप्या युतीला माफी नाही-तटकरे

जिल्हा परिषदांसाठी छुप्या युतीला माफी नाही-तटकरे

sunil-tatkare125 जानेवारी : नगरपालिकेच्या निवडणुकीत 25 जिल्हा परिषदांमध्ये आघाडी करण्याबाबत कॉंग्रेसशी चर्चा झालेली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय. मात्र स्थानिक पातळीवर जर कुणी शिवसेना  आणि भाजपशी छुपी युती करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी जर भाजप- शिवसेनेशी हातमिळवणी केली तर त्यांना एबी फॉर्मस् सुद्धा दिले जाणार नाहीत. उस्मानाबादमध्ये कॉंग्रेस शिवसेनेशी आघाडी करतंय अशा बातम्या कानावर आल्यात.  कॉंग्रेसने त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केलीय. विधानसभेमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या अट्टाहासामुळे आघाडी तुटली हे जगजाहीर आहे. त्याचा फायदा कोणाला झाला ते सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे यावेळी तरी काँग्रेसने योग्य भूमिका घ्यावी अशी अपेक्षा तटकरेंनी ठेवलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: राष्ट्रवादी, सुनील तटकरे