Home /News /news /

जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

jitendra_Awahadपुणे - 24 मार्च : फर्ग्युसन कॉलेजमध्ये धक्काबुक्की प्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड विद्यार्थ्यांना भेटायला कॉलेजमध्ये गेले होते. तिथे त्यांना धक्काबुक्की झाली. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.

दिल्लीमधल्या जेएनयू घोषणाबाजी प्रकरणाचे पडसाद गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये उमटत आहेत. अभाविपनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निमित्त झालं, तेव्हापासून सुरू झालेला वाद काल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की होईपर्यंत चिघळला. या प्रकरणी 4 ते 5 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दंगल माजवणे, सरकारी कामात अडथळे आणणे हे गुन्हे आहेत. आव्हाड विद्यार्थ्यांना भेटायला फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले होते. त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. पोलिसांना लाठीमारही करावा लागला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड फर्ग्युसन कॉलेजच्या आवारातून बाहेर पडले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Abvp, Pune, अभाविप, जितेंद्र आव्हाड, पुणे, राष्ट्रवादी

पुढील बातम्या