मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जातपंचायतीच्या जाचाचा आणखी एक बळी, दापोलीत तरुणाची आत्महत्या

जातपंचायतीच्या जाचाचा आणखी एक बळी, दापोलीत तरुणाची आत्महत्या

dapoli4404 सप्टेंबर : जातपंचायतीविरोधा विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पडून असतानाच या पंचायतींच्या जाचाने दिवसेंदिवस आणखी बळी जात आहेत.दापोली तालुक्यातील तामसतीर्थ या गावात बहिष्काराला कंटाळत एका तरूणाने आत्महत्या केली.

ही घटना 2 सप्टेंबरला घडली. भंडारी समाजाच्या जातपंचायतीने रुपेश बागकरच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला होता. या जाचाला कंटाळत रूपेशने विहिरीत उडी मारून जीव दिला. त्याचदिवशी त्याने उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांसमोर आपली कैफियत मांडली होती. पण पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रुपेशच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केलीये. भंडारी जातपंचायतीने वाळीत टाकल्यानेच आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचं मृत रुपेश बागकरच्या आईवडलांचं म्हणणं आहे. जातपंचायतीच्या पंचांना अटक झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. जातपंचायतीविरोधा कायद्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी मागणीही सामाजिक संस्थांकडून होते आहे.

सामाजिक बहिष्कारविरोधी विधेयक

-13 एप्रिल 2016 ला विधिमंडळाकडून मंजुरी

-राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर कायदा अस्तित्वात येणार

काय आहेत तरतुदी?

- मौखिक किंवा लेखी बहिष्काराला बंदी

- धार्मिक,सामाजिक, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रतिबंध करणाऱ्याला शिक्षा

- कोणत्याही कारणावरून वाळीत टाकणाऱ्याला शिक्षा

- सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या गुन्ह्यासाठी 3 वर्षांची शिक्षा, 1 लाखापर्यंत दंड

- नुकसानभरपाई म्हणून वसूल केलेल्या रकमेपैकी काही रक्कम पीडितांना मिळणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Dapoli, आत्महत्या, जातपंचायत, दापोली