मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जळगावात अतिवृष्टी,बळीराजा हवालदिल

जळगावात अतिवृष्टी,बळीराजा हवालदिल

23 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालीय. निंबोलमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय. या नैसर्गिक आपत्तीला कंटाळून निंबोल इथल्या अरूण तापीराम पाटील या शेतकर्‍यानं दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. विवरे, ऐनपूर अशा भागातल्या काही शेतकर्‍यांना हा आघात सहन न झाल्यानं त्यांना मानसिक धक्का बसलाय. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलंय. अतिवृष्टीमुळं वादळात वाचलेली पिकं अतिवृष्टीमुळे कोलमडून पडतायत. या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे. रावेर तालुक्याला वर्षभरात चार वेळा चक्रीवादळ एकदा गारपीटीचा तडाखा बसलाय. तर दोन वेळा महापूर आल्यानं शेतीचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय.

First published:

Tags: Jalgaon, Rain, जळगाव, धुळे, नंदूरबार, पावसाचा कहर, पूर, बळीराजा हवालदिल