मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जळगाव,गडचिरोलीत पावसाचे धुमशान

जळगाव,गडचिरोलीत पावसाचे धुमशान

jalgaon rain09 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्याच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालाय. अनेक भागात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पावसाने संततधार हजेरी लावली होती. काही भागात धुवाधार पाऊस झाल्याने जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचं पाणी काही गावात आल्याने काही गावांशी संपर्क तुटला आहे. तर गडचिरोलीतही पावसाने धुमशान घातले असून पुरपरिस्थिती निर्माण झालीये.

जळगावात संततधार पावसामुळे नद्या, नाले तुटुंब भरून वाहत आहे. पुराचं पाणी काही गावात आल्याने काही गावांशी संपर्क तुटला आहे. शहरातील मेहरूण तलाव ओसंडून वाहतोय. त्यात जामनेर तालुक्यातील देवपिम्प्री गावाला पुराचा वेढा पडला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहराबरोबर इतर तालुक्यांमध्ये गेल्या 24 तासांपासून संततधार सुरू आहे.

हतनूर धरणाचे सगळे 41 दरवाजे दरवाजे उघडल्यामुळे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जवळपास 100 मिलीमिटर पावसाची नोंद झालीये. धुळे शहर आणि परिसरातही सोमवारी जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावलाय. पावसामुळे नदी आणि नाल्यांमध्येही पाणी भरलंय. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होणार आहे. शेतकर्‍यांचं यामुळे प्रचंड नुकसान झालंय. कापूस, केळी आणि सोयाबीन या पिकांचं नुकसान झालंय.

गडचिरोलीत पुरस्थिती

तर गडचिरोलीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झालीय. पावसामुळे पर्णकोटा आणि प्राणहिता नदीला पूर आलाय. सिंरोंचा आणि भामरागड तालुक्यातल्या 200 गावांचा अजुनही संपर्क तुटलाय. तुटलेलाच असून या गावांमध्ये वीजही बंद आहे.

गडचिरोलीच्या सीमेवर असलेल्या छत्तीसगढ आणि आंध्रप्रदेशातल्या नद्यांना असलेल्या पुराचं पाणीही येत असल्याने नदीकाठच्या गावांना धोका सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसंच वर्ध्यात गेल्या 24 तासांपासून पडणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वर्धा, सेलू, देवळीमध्ये सर्वाधिक पाऊस पडलाय असून नदीनाले तुडुंब भरून वाहतायत. यवतमाळमध्येही दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हाहाकार माजवलाय. पैनगंगा, खुनी, वर्धा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Gadchiroli, Jalgaon, गडचिरोली, जळगाव, पूर

पुढील बातम्या