10 जुलै : 'जय जवान, किसान' नारा देत मोदी सरकारने देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणार्या जवानांना आणि बळीराजाला खूश केलंय. मोदी सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यात प्रामुख्याने शेतकरी आणि देशासाठी लढणार्या जवानांसाठी खास घोषणा करण्यात आल्यात. संरक्षण क्षेत्रात एफडीआयला दार मोकळे करण्यात आले असून आता एफडीआयची मर्यादा 49 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच संरक्षण क्षेत्रासाठी 2.29 लाख कोटींची तरतूद करण्यात आलीय. गोव्यात आयएनएस विक्रामादित्य लोकार्पण सोहळ्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसाठी वन रँक वन पेंशन योजना आणि युद्ध स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली होती. मोदींनी आपला शब्द पाळत बजेटमध्ये वन रँक वन पेंशन योजना राबवण्याठी 1 हजार कोटींची तरतूद केली आहे. आणि देशात पहिल्यांदात युद्ध स्मारक उभारण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
'बळीराजा तुझ्यासाठी काय पण'
मोदी सरकारने आश्वासनं दिल्याप्रमाणे 2015 पर्यंत 4 टक्के कृषी दरात वाढीचे लक्ष्य ठेवत शेतकर्यांसाठी भरभरुन घोषणा केल्यात. सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवण्यात येणार असून यासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकर्यांसाठी नवीन 'किसान टीव्ही' चॅनल सुरू करणार अशी घोषणा करण्यात आलीय. या 'किसान टीव्ही' चॅनलसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आलीय. त्याचबरोबर नेहमी कृषी मालाची साठवणूक करण्याची अडचण लक्षात घेता गोदामासाठी 5 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकर्यांना कृषी कर्जासाठी 8 हजार कोटींची तरतूदही करण्यात आली.
संरक्षणासाठी घोषणा
शेतकर्यांसाठी घोषणा
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arun Jaitley, Budget, Farmar, Farmars, FDI, Home loan, Income tax, Income tax free, Indian army, Indian union budget, Loan, Modi, Modi sarkar, Narendra modi, NDA, Oil, Petrol, Tax, Union budget 2014, अर्थसंकल्प, किसान, जय जवान, बळीराजा, वन रँक वन पेंशन योजना, संरक्षण