मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /जयललिता एनडीएला पाठिंबा देणार ?

जयललिता एनडीएला पाठिंबा देणार ?

    545jayalalita31 मे : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता पुढच्या आठवड्यात भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार अशी चर्चा सुरू असतानाच आता अण्णा द्रमुक एनडीएच्या बाजूने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही ठराविक मुद्दयांवर अण्णाद्रमुक राज्यसभेत एनडीएला पाठिंबा देईल. त्याबदल्यात तामिळनाडूनसाठी विकास पॅकेजेस देण्यात येतील. भाजपचे नेते आणि अर्‍थमंत्री अरुण जेटली आणि कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

    विशेष म्हणजे निकालाच्या अगोदर जयललिता एनडीएला पाठिंबा देतील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्तांनी याबद्दल खुलासा केला होता पण असा खुलासा केल्यामुळे जयललितांनी दोन जणांची हकालपट्टी केली होता.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] [sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:

    Tags: Narendra modi, NDA, एनडीए, तामिळनाडू, नरेंद्र मोदी