01 सप्टेंबर : मुंबईत झालेल्या पहिल्या प्रो कबड्डी लीगमध्ये अभिषेक बच्चनच्या पिंक पँथर्स टीमचा विजय झाला आहे. मुंबई वरळीतल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमवर काल रात्री ही मॅच पार पडली. फायनलमध्ये पिंक पँथर्सने 35-24ने यू मुम्बाचा पराभव केला आहे. महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात मुंबई संघाकडून पराभूत झालेल्या अभिषेक बच्चन यांच्या जयपूर संघानं थाटात पराभवाची परतफेड केली आहे. अतिशय नियोजनबद्ध खेळ करणार्या जयपूर पिंक पैंथरने पिछाडीमुळे अस्थिर झालेल्या यू मुम्बाचा पराभव करून पहिल्यावहिल्या प्रो-कबड्डीचे विजेतेपद पटकावलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Pro kabaddi league, Pro kabddi, बारामती