मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात 2 ठार, 6 जखमी

जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात 2 ठार, 6 जखमी

Terrorist28 मार्च : जम्मू-काश्मीरमध्ये कथुआ इथं आज सकाळी झालेल्या चकमकीत 2 अतिरेकी ठार झाले आहेत. लष्कराच्या कॅम्पजवळ ही चकमक झाली. यात एका पासून दोन हल्ले घडवून आणणार्‍या 4 दहशतवाद्यांपैकी 2 जण ठार झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर 1 जवान व 1 नागरिकही मृत्युमुखी पडले आहेत.

दहशतवादी व लष्करामध्ये कथुआतल्या 'जंगलोत' परिसरात चकमक सुरू आहे. कथुआ परिसर भारत- पाकिस्तान सीमेवर आहे. आज पहाटे लष्करी गणवेषातल्या या दहशतवाद्‌यांनी केलेल्या पहिल्या हल्ल्यात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले होते. त्यानंतर बोलेरो गाडीतून पळालेल्या या दहशतवाद्‌यांनी 'जंगलोत' परिसरात लष्कराच्या एका कॅम्पवर हल्ला केला. आतापर्यंत एकूण 6 जण जखमी झाले असून जखमींना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Terrorism, Terrorist attack, दहशतवादी हल्ला