16 मे : आजच्या निकालात जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे आणि आम्ही पराभवाची जबाबदारी स्वीकारतो असं स्पष्टीकरण काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आज (शुक्रवारी) संध्याकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आली तर हार,जीत असतेच. आमच्या विरोधात जनतेचा कौल होता हे आम्हाला मान्य आहे. आम्ही मतदारांच्या निर्णयाचा विन्रमपणे स्वीकार करतो असं सोनिया गांधी म्हणाल्या. तर राहुल गांधी यांनीही पराभावाची जबाबदारी स्वीकारली आणि मोदी सरकारचं अभिनंदन केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, NDA, Rahul gandhi, Sonia gandhi, राहुल गांधी, सोनिया गांधी