03 सप्टेंबर : बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकत्र आलेल्या जनता परिवाराला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग या महाआघाडीमधून बाहेर पडले आहे. जागा वाटपाच्या मुद्यावरुन मुलायमसिंग नाराज आहेत. जागावाटप करतांना समाजवादी पार्टीला ग्राह्य धरण्यात आलं नाही असा आरोप पक्षाकडून करण्यात येतोय.
बिहार विधानसभेच्या 243 जागा आहेत. त्यापैकी जेडीयू आणि आरजेडीला प्रत्येकी 100 जागा देण्यात आल्यात. तर काँग्रेससाठी 40 जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाला काहीच स्थान राहिलेलं नाही. म्हणून मुलायम सिंग यादव नाराज आहेत.
दरम्यान, मुलायम सिंह यादव यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी दिल्लीमधल्या त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, या भेटीत नक्की काय बातचीत झाली ते सांगण्यात आलं नाही. दुसरीकडे या पार्श्वभूमीवर बिहार काँग्रेसच्या नेत्यांची नवी दिल्लीतच बैठक घेण्यात आली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP