मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

छोटा राजनला 15 दिवसांआधीच झाली होती अटक ?

छोटा राजनला 15 दिवसांआधीच झाली होती अटक ?

Rajan arrest banner28 ऑक्टोबर : गँगस्टर छोटा राजन उर्फ राजन निकाळजेला अटक झाल्यानंतर त्यासंबंधी निरनिराळ्या तर्कवितर्कलढवले जात आहेत. IBN नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार, छोटा राजनला जवळपास 15 दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. वरिष्ठ सरकारी सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

छोटा राजनला खरंच पकडण्यात आलं की त्याच्याबरोबर काही सौदा करण्यात आला होता असे प्रश्न विचारले जाताहेत. भारतीय गुप्तचर संस्थांना छोटा राजननं खबरी म्हणून मदत केल्याची चर्चा होत असते. पण, छोटा राजनवर हल्ला होण्याची शक्यता आहे, तो टाळण्यासाठी त्यानं शरणागती पत्करावी असं सांगून गुप्तचर संस्थांनी त्याला शरण येण्यासाठी राजी केलं अशी माहिती मिळत आहे. अलीकडे टॅप केलेल्या फोनवरच्या संभाषणानुसार, छोटा राजन सिडनीमध्ये असताना छोटा शकील त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा राजनच्या अटकेमुळे दाऊद इब्राहिमविषयी काहीही माहिती मिळण्याची शक्यता नाही. तसंच दाऊदला पाकिस्तानचं संरक्षण आहे, तोपर्यंत दाऊदला अटक करणं कठीण आहे असंही सूत्रांचं म्हणणं आहे.

फोन टॅपमुळे राजन जाळ्यात

राजन सिडनीहून बालीला तो गरूड इंडोनेशिया फ्लाईटनं गेला होता. त्याचा बोर्डिंग पास आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलाय. तसंच राजन जाळ्यात कसा अडकला, त्याची खास माहितीसुद्धा आयबीएन-नेटवर्कला मिळालीय. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या शनिवारी राजननं त्याच्या जवळच्या सहकार्‍याला फोन केला. हा फोन गुप्तचर संस्थांनी टॅप केला. आपल्याला ऑस्ट्रेलियात असुरक्षित वाटतंय आणि इंडोनेशियाला जाण्याचा विचार सुरू आहे, असं राजननं आपल्या सहकार्‍याला सांगितलं. ही माहिती मिळताच सीबीआय, मुंबई क्राईम ब्रँच, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाच्या पोलिसांनी छोटा राजनला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: #छोटाराजन, Chhota Rajan, Chhota rajan arrested, Dawood ibrahim, गँगस्टर, छोटा राजन, छोटा शकील, दाऊद इब्राहिम

पुढील बातम्या