03 जुलै : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम जिवंत आहे आणि त्याचा शत्रू छोटा राजनला मारण्यामागेही त्याचा हात होता हे सिद्ध झालंय. दाऊदच्याच माणसांनी छोटा राजनला मारल्याचं स्पष्ट झालंय. दाऊदनं त्याचा खास असलेला छोटा शकील याला छोटा राजनला मारण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवलं होतं असं पुढे आलं आहे. काही गुप्तचर संस्थांनी छोटा शकीलचा फोन रेकॉर्ड केला. त्यातला दुसरा आवाज तपासून पाहिल्यावर तो दाऊदचाच असल्याचं स्पष्ट झालं आहे.
छोटा राजन दाऊदबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती भारतीय गुप्तचर संस्थांना सांगत होता. त्यामुळेच त्याला मारण्यासाठी दाऊद आतूर झाला होता. विशेषत: गेल्या वर्षी भाजप सरकार सत्तेत आल्यापासून या योजनेला वेग आला होता, अशी माहितीही मिळतेय.एप्रिल महिन्याच्या मध्यावर छोटा शकीलचं संभाषण गुप्तचर संस्थांनी रेकॉर्ड केलं.त्यानंतर आठवड्याभरातच शकील अमेरिकेला गेला आणि तिथून तो ऑस्ट्रेलियाला गेला.छोटा शकील आणि राजनचा सहकारी यांच्यामधल्या फोनवरच्या संभाषणात एक आवाज सतत येत होता. शकील बोलायचा थांबल्यावर हा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. या आवाजाची दाऊदच्या उपलब्ध असलेल्या आवाजाच्या नमुन्याशी तपासणी केल्यावर तो दाऊदचाच असल्याचं स्पष्ट झालं.
2000 साली बँकॉकमध्ये छोटा राजन त्याच्यावरच्या हल्ल्यातून बचावला होता. तसं पुन्हा होऊ नये यासाठी दाऊद स्वत:हून या प्लानवर लक्ष ठेवून होता.शकीलने एप्रिल महिन्यापासून जवळपास 30 दिवस प्रवास केल्याचं उघड झालंय,त्यानं दुसर्या नावानं असलेल्या पासपोर्टवर प्रवास केला. पण तो पासपोर्ट बनावट नाही, असंही सूत्रांनी सांगितलं.अमेरिकेत तो त्याच्या अगदी जवळच्या नातेवाईकाकडे राहिला होता आणि त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला गेल्याचीही माहिती आहे.
दाऊदच्या निशाण्यावर छोटा राजन++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dawood ibrahim, छोटा शकील, दाऊद