मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'छकुली'वर अत्याचार करणारा नराधम अखेर अटकेत

'छकुली'वर अत्याचार करणारा नराधम अखेर अटकेत

wadala3454304 डिसेंबर : वडाळा बलात्कार प्रकरणी अखेर छकुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणातील संशयित प्रमुख आरोपी शफीक शाहला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. शफीकला 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये. धक्कादायक म्हणजे शफीक हा पीडित मुलीला पळून नेण्याचा प्रयत्न करत होता.

मुंबईतील वडाळा भागात शांतीनगर इथं 24 ऑक्टोबर रोजी या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. पीड़ित मुलीच्या वडिलाचे स्वीट मार्टचे दूकान आहे. ही मुलगी दुकानासमोर फटके उडवत होती. त्यावेळी एका अनोळख्या इसामाने तिला पळवून नेऊन अत्याचार केला होता. पीडित मुलीच्या वडिलांनी ही बाब लक्षात आल्यावर मुलीचा शोध घेतला पण मुलगी दिसली नाही. त्यानंतर पालकांनी वडाळा टी.टी.पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तीला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आलं. पण 28 दिवसांत तिच्यावर धड चांगले उपचारही झाले नव्हते. आयबीएन लोकमतने ही बाब उजेडात आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कामाला सुरूवात केली. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी तपासाची सूत्रं फिरवलीय. या प्रकरणी 2 संशयितांचे रेखाचित्र जारी करण्यात आले तर 140 जणांची डीएनए टेस्ट घेण्यात आली होती. अखेरीस यातील मुख्य संशयित असलेला शफीक शाहच्या पोलिसांनी बुधवारी मुसक्या आवळल्या. त्याला अटक करण्यात आलीये. पोलिसांनी खाक्या दाखवताच शफीक पोपटासारखा बोलू लागला. शफीक पीडित मुलीला पळवून नेऊन अत्याचार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही त्या पीडित मुलीला पळवून नेण्याचा कट त्याने रचला होता. पण काही सजग नागरिकांमुळे पीडित मुलगी त्याच्या तावडीतून वाचू शकली. शफीकला आता अटक करण्यात आली असून त्याला 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Rape, Rape case, बलात्कार, वडाळा, सायन हॉस्पिटल

पुढील बातम्या