Home /News /news /

छकुलीवर अत्याचाराची 'ती' काळरात्र...

छकुलीवर अत्याचाराची 'ती' काळरात्र...

25 नोव्हेंबर : मुंबईतील छकुलीवर झालेल्या पाशवी बलात्काराला एक महिना उलटला...या अत्याचाराच्या काळरात्री नेमकं काय घडलं ?, जिथं बलात्कार झाला तिथलं मोठं गवत कापण्यात का आलं? याच मार्गावरच्या सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना पुरावे का मिळाले नाहीत, याबद्दलचा हा आढावा... 24 ऑक्टोबर (जेव्हा आपण सारे दिवाळीची मजा लुटत होतो) – रात्री दहाची वेळ. वडील वडापावच्या ठेल्याची सफाई वगैरे कामात व्यस्त – 10 वर्षांचा मोठा भाऊ, तीन आणि चार वर्षांची आणखी दोन शेजारची मुलं आणि ही नऊ वर्षांची छकुली वडाळ्यामध्ये समोरच खेळत होते – काम संपल्यानंतर आपली मुलगी या मुलांमधून गायब झाल्याचं वडिलांच्या लक्षात आलं. त्यांनी मित्राला बोलवून आसपास शोधाशोध सुरू केली. – अर्ध्या तासात रडत, रक्तस्राव येत असलेली छकुली दुरून घराच्या दिशेने चालत येत होती. – भेदरलेल्या, घाबरलेल्या पालकांनी तिच्याकडून काय झालंय ते जाणून घेतलं. तिच्यावर पाशवी बलात्कार जबरी संभोग केल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तडक वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशन गाठलं. – तोपर्यंत रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. तिथे तब्बल अडीच तास एफआयआर नोंदवण्यात आला. तोपर्यंत मुलगी वेदनेनं कळवळत होती. – एफआयआर नोंदवून पूर्ण होईपर्यंत ती बेशुद्धीच्या अवस्थेपर्यंत निपचित पडून होती…तिच्यावरच्या मानसिक आघाताची तर आपल्याला कल्पनाही करता येणार नाही ती अदृश्य वेदना वेगळीच…. – त्यानंतर तिला पहाटे सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे फॉरेन्सिकसाठी वगैरे सगळ्या चाचण्या झाल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Rape, Rape case, बलात्कार, वडाळा, सायन हॉस्पिटल

पुढील बातम्या