Home /News /news /

चिपळूण : परशुराम घाटात एसटीवर अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला

चिपळूण : परशुराम घाटात एसटीवर अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला

chipalunचिपळूण, 21 सप्टेंबर : मुंबई-गोवा हायवेवर चिपळूण येथील परशुराम घाटात रात्री उशिरा 5 ते 7 तरुणांनी एसटीवर हल्ला केला. यावेळी वाहक आणि चालकास मारहाण करण्यात आली असून इतर प्रवाशी कोणीही जखमी नाही. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलीये. या घटनेमुळे घाटात काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. हल्लेखोरांनी या बसचे दार उघडून चालक आणि वाहकला मारहाण केली. तर बाकीच्या मारेक•यांनी बाहेरुन बसच्या काचा फोडल्या. या प्रकारानंतर चालकाने एसटी चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये आणून लावली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास केला. सकाळपर्यंत या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात यश आलंय. अद्याप या हल्ल्यामागचं कारण मात्र अस्पष्ट आहे. जीपमधून हे हल्लेखोर आले होते. आणि त्यांच्यासोबत एक तरूणीही होती अशी प्राथमिक माहिती समोर आलीये. मात्र हा हल्ला का करण्यात आला त्याबाबत काहीही कळू शकलेले नाही. या घटनेनंतर चालकाने ही बस पोलीस स्टेशनमध्ये आणून लावली. या संदर्भात चिपळूण पोलीस पुढील चौकशी करत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: St bus, एसटी बस, चिपळूण

पुढील बातम्या