Home /News /news /

चिपळूणमध्ये राष्ट्रवादीत फुटले 'फटाके', भास्कर जाधव 'मैदानाबाहेर'

चिपळूणमध्ये राष्ट्रवादीत फुटले 'फटाके', भास्कर जाधव 'मैदानाबाहेर'

27 ऑक्टोबर : चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत वाद चांगलाच उफाळून आला आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकांबाबतचे सर्वाधिकार पक्षानं माजी आमदार रमेश कदम यांच्याकडे दिले आणि यावादाची ठिणगी पेटलीये. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला, तर भास्कर जाधवांनी पक्षाचं वाटोळं केलं असा प्रतिहल्ला रमेश कदम यांनी केलाय. वारंवार हस्तक्षेप करुन संघटना खिळखिळी केल्याचा आरोप कदम यांनी जाधव यांच्यावर केलाय.

bhaskar_jadavकोकणाचे राष्ट्रवादीचे खंदे नेते भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीने थोडे लांब ठेवले आहे . शरद पवार यांनी जुने कार्यकर्ते माजी आमदार रमेश कदम यांना चिपळूण संगमेस्वर विधानसभा क्षेत्राची सर्व सूत्रे हाती दिली आहेत. चिपळूणमध्ये रमेश कदम मागील नगरपालिका निवडणुकीत सुद्धा सक्रिय होते. भास्कर जाधव आणि रमेश कदम दोघेही राष्ट्रवादी बलाढ्य नेते. त्यात रमेश कदम पवारसाहेब यांचे खास विश्वासू अशी त्यांची ओळख मात्र चिपळूणमध्ये या दोन्ही नेत्यात वर्चस्वाची लढाई कायम पहावयास मिळत होती.

मागील नगरपालिका निवडणुकीत फ़क्त चिपळूण नगरपालिकेची जबाबदारी रमेश कदम यांना शरद पवार यांनी दिली होती. यावेळी भास्कर जाधव समर्थक यांनी शहर विकास आघाडी वेगळे पॅनल तयार केले यात भास्कर जाधव यांचे चिरंजीव होते असे असताना देखील राष्ट्रवादीची सत्ता रमेश कदम यांनी आणली. म्हणूनच यावेळी रमेश कदम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीये. या निर्णयामुळे भास्कर जाधव नाराज आहेत.

भास्कर जाधव नाराज

पक्षाच्या जिल्ह्याच्या निर्णय प्रक्रियेत प्रदेश पातळीवर विश्वासात घेतले जात नसल्याची खंत भास्कर जाधवांनी बोलून दाखवली. हे वारंवार होत असल्याने कार्यकर्त्याचं खच्चिकरण होतंय. 12 वर्षात माझा एकही कार्यकर्त्या साधा पक्षाच्या कार्यकारणीवर घेतला नाही. मी माझ्या लोकाना- कार्यकर्त्या सोडून कुठे ही जाणार नाही .पण माझ्या कार्यकर्त्यांवरचा अन्याय मी आणखी किती सहन करू अशी व्यथाच जाधव यांनी मांडली. मी जिल्ह्यातून तुमच्या सगळ्या बरोबर आलोय. पण मी यापुढे जिल्ह्याच नेतृत्व करणार नाही असं जाधवांनी जाहीर करून टाकलं.

तर दुसरीकडे, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनाही विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे निकमही नाराज आहेत. दरम्यान या सगळ्या घटनेमुळे कार्यकर्ते चांगलेच संभ्रम अवस्थेत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Bhaskar jadhav, चिपळूण, भास्कर जाधव, राष्ट्रवादी

पुढील बातम्या