मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चिंचवड :गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नगरसेवक अविनाश टेकवडेंची हत्या

चिंचवड :गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नगरसेवक अविनाश टेकवडेंची हत्या

avinash tekvade03 सप्टेंबर :पिंपरी  चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहननगर प्रभागातील नगरसेवक अविनाश टेकवडे यांची हत्या करण्यात आलीय. दोन अज्ञात हल्लेखोरांनी आज दुपारी त्यांच्या घरी त्यांच्यावर हल्ला केला. डोळ्यात मिरचीपूड टाकून नंतर धारदार शस्त्राने त्यांना भोसकण्यात आलं. हल्ल्यामध्ये अविनाश टेकवडे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतील टेकवडे यांना चिंचवड येथील निरामय या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे मोहननगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अविनाश टेकवडे आणि त्यांच्या पत्नी घराबाहेर निघाले असताना त्यांच्या घरासमोरच आलेल्या दोन हल्लेखोरांनी टेकवडे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकूण त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर हे हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी टेकवडे यांच्या घराला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेज ताब्यात घेतले आहेत. टेकवडे याच्यावर देखील मारहाण, खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापूर्वी जानेवारी 2013 मध्येही टेकवडे यांच्यावर चाकू हल्ला झाला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: पिंपरी-चिंचवड, राष्ट्रवादी काँग्रेस

पुढील बातम्या