मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चंद्रभागेच्या नदी पात्रात बांधकामासाठी तुर्तास परवानगी

चंद्रभागेच्या नदी पात्रात बांधकामासाठी तुर्तास परवानगी

6343630 जानेवारी : माघी यात्रेकरता आज आणि उद्या पंढरपूर चंद्रभागेच्या नदीपात्रात राहुट्या आणि तंबू उभारण्याची परवानगी मुंबई हायकोर्टाने दिली आहे. पण हायकोर्टाने दिलेला आदेश हा फक्त या वर्षापुरता आहे, पुढच्या वर्षी अशा प्रकारे बांधकाम करता येणार नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय.

यापूर्वी हायकोर्टाने चंद्रभागेच्या पात्रात बांधकामं करण्यास मनाई करणारा आदेश दिला होता. पण या आदेशाची अंमलबजावणी करताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं कारण देत राज्य सरकारनं नदीपात्रात बांधकाम करण्याची परवानगी मागितली होती.तसंच यापुढे पंढरपूर देवस्थान संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर राहुट्या आणि तंबू बांधण्याची लिखीत हमी देण्याचे हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Chandrabhga, Pandharpur, चंद्रभागेच्या नदीपात्रात, पंढरपूर, माघी, मुंबई हायकोर्ट

पुढील बातम्या