04 फेब्रुवारी : पंजाब आणि गोव्यामधील विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. गोव्यामध्ये सकाळी 7 वाजता तर पंजाबमध्ये सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या मतदानाचा हक्कही बजावला.
पंजाबमध्ये अकाली दल-भाजपाची युती लागोपाठ तिस-यांदा सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तर गोव्यातही संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला काँग्रेस आणि गोवा-पंजाबमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणा-या आम आदमी पार्टीकडून कडवं आव्हान दिलं जात आहे. गोवा आणि पंजाबनंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.