07 ऑक्टोबर : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमागे घातपात नाही, तर तो अपघात होता असा निर्वाळा चौकशी अहवालात देण्यात आलाय. मुंडेंच्या अपघाताची सीबीआयमार्फेत चौकशी करण्यात आली. पण, तो अपघातच होता, असं सीबीआयच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आणि भाजप आमदार पंकजा मुंडे यांनीही हा अहवाल आपल्याला मान्य असल्याचं म्हटलंय.
3 जून रोजी नवी दिल्लीत सकाळी गोपीनाथ मुंडे यांच्या कारला एका इंडिका कारनं धडक दिली होती. त्यात मुंडे यांचा मृत्यू ओढावला. पण, हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी या घटनेचे संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आणि गोपीनाथ मुंडेंचे पुतणे, आमदार धनंजय मुंडे यांनीही आता अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपच्या नेत्यांनीही केद्रीय गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी लावून धरली होती. अखेरीस सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली असून आज त्यांनी मुंडेंचा मृत्यू अपघातामुळेच झाल्याचा निर्वाळा दिला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.