20 सप्टेंबर : तुम्ही जर गृहकर्ज अथवा इतर कोणतही कर्ज घेण्याच्या विचार करत असाल तर आता कर्ज घेणं हे महाग पडू शकतं. कारण आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं बहुप्रतिक्षित पतधोरण जाहीर झालंय. या धोरणामुळे गृहकर्जांसह सर्व प्रकारची कर्ज महागणार आहेत.
या धोरणात आरबीआयकडून रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट मध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट्सी वाढ करण्यात आलीय. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठीच आरबीआयनं ही वाढ केलीय.
रघुराम राजन यांच्या या धोरणाची अजिबात अपेक्षा नसणार्या शेअर बाजारानं मात्र नकारात्मक प्रतिक्रिया दिली असून आरबीआयच्या या घोषणेनंतर सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळलाय. सीआरआरमध्येही कपात करण्यात आली असून बँकांसाठी 99 टक्क्यांवरून 95 टक्के इतका करण्यात आली आहे. रघुराम राजन यांची नुकतीच बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आलीय. आणि ते नेमके काय धोरण जाहीर करतायत याबद्दल उत्सुकता होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.