मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /गुजरातच्या पावसाचा नंदुरबारला फटका, घरांची पडझड

गुजरातच्या पावसाचा नंदुरबारला फटका, घरांची पडझड

    nandurbar rain27 जून : गुजरातमध्ये सुरू असलेल्या अतीवृष्टी आणि वादळाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातल्या सातपुडा पर्वतरांगातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यांना बसला आहे. गुजरातच्या सीमेलगत असल्याने याठिकाणी वादळवार्‍यांसह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक आदिवासी बाधवांची डोंगरदर्‍यावरची घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत. तर अनेक घरांचे पत्र आणि कौलही उडून गेली आहेत.

    दोन दिवसांपुर्वी झालेल्या या तडाखेदार पावसाने अनेक गाव आणि पाड्यावरचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून अनेक गाव आणि पाड्यांचा संपर्क तुटला आहे. यासोबतच दुर्गम भागातले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रमशाळांमध्ये पडझड झाली असून त्याचा फटका रुग्णसेवेला ही बसला आहे.

    सोबतच सातपुड्याच्या दुर्गम भागातल्या जंगलातील अनेक वृक्ष उन्मळुन पडली आहे. वीज आणि मोबाईलला कव्हरेज नसल्याने या गाव आणि पाड्याचे हाल अद्यापही प्रशासना पर्यंत पोहचू शकले नसल्याने प्रशासन या सर्वच नुकसानी बाबत अनभिज्ञ असल्याचा प्रकारही समोर आला आहे.

     ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published: