22 डिसेंबर : नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. गणेश नाईकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आजी-माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण महापालिकांमधले 162 नगरसेवकही नाईकांच्या संपर्कात असल्याचंही कळतं. गणेश नाईक यांना मंत्रिपद हवंय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतं आहे. तसंच,नाईकांना सिडकोचं अध्यक्षपदही हवं आहे. या चर्चेनंतर आता गणेश नाईकांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू राष्ट्रवादीने सुरू केले आहेत. शरद पवारांनी गणेश नाईकांशी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, NCP, गणेश नाईक, राष्ट्रवादी