17 सप्टेंबर : गणेशोत्सव आनंदात, उत्साहात आणि कुठल्याही विघ्नाशिवाय पार पडावा यासाठी पोलीसही सज्ज आहेत. राज्यभरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. यंदा ड्रोन कॅमेरे आणि सोशल मीडियावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.
मुंबईमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मोठमोठे गणपती असतात, रस्त्यावर गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असते, त्यामुळे मुंबईत विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मुंबईवर सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर तर असणार आहेच. पण त्याचबरोबर यंदा ड्रोन कॅमेरेही आकाशातून मुंबईवर लक्ष ठेवतील. याशिवाय 35 हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात असतील. मुंबईतल्या गर्दीच्या 97 रस्त्यांवर वाहनांना बंदी घालण्यात आलीय. विशेष म्हणजे सोशल मीडियावरून प्रक्षोभक पोस्ट टाकणार्यांवरही यंदा पोलिसांचं लक्ष असणार आहे. त्यासाठी सोशल मीडिया सेलही दक्ष आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bappa morya re, गणपती बाप्पा, गणेशोत्सव, बाप्पा, बाप्पा मोरया रे, मुंबई, सोशल मीडिया