Home /News /news /

बुलढाणा आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी 11 जणांना अटक

बुलढाणा आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी 11 जणांना अटक

buldhana34

04 नोव्हेंबर :  बुलढाण्यातील खामगाव इथल्या कोकरे आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रात्रभरात चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात एकूण 13 आरोपी असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा बुलढाण्याकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणी विष्णू सावरा आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याची नैतिक जबाबदारी स्विकारुन आदिवासी विकास मंत्री आणि महिला आणि बालविकास मंत्री यांची हकालपट्टी करण्यात यावी’, असं नवाब मलिक यांनी म्हटले आहे. याशिवाय बुलढाण्यातील आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला आहे. खामगावच्या नीनाजी कोकरे आश्रमशाळेत आदिवासी मुलींवर बलात्कार घडल्याची धक्कादायक घटनमुळे काल अख्खा महाराष्ट्र हदरला. घरी गेली होती. त्यावेळी मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार तिच्या पालकांकडे केली. यानंतर हा संपूर्ण प्रकरणाला खऱ्याअर्थाने वाचा फुटलीय. पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार आश्रमशाळेतील 5 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं काल उघडकीस आलं होतं. या प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडून देण्यात आले आहेत. याशिवाय नागपूर सीआयडी विभागाच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग या खामगावला भेट देणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बुलढाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर यांच्या निदर्शनाखाली होणार आहे.

काय आहे घटनाक्रम?

 • निनाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळा, पाळा (खामगाव)
 • शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा
 • आश्रमशाळेत एकुण 105 मुली शिकत आहे
 • जळगाव, अकोला, बुलडाण्यातील मुली या आश्रमशाळेत आहेत
 • दिवाळीत सुट्टीवर गेलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथल्य़ा मुलींनी बलात्कार झाल्याची बाब पालकांना सांगितली
 • बुधवारी रात्री एकनाथ खडसे यांच्याकडे या पिडीत मुलीच्या पालकांनी भेटून तक्रार केली
 • खडसे यांनी रात्री उशिरा पाडूरंग फुंडकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली
 • त्यानंतर सूत्र वेगाने हालली, फूंडकरांनी पोलिसांना ताबडतोब कारवाई करण्याच्या सुचना दिल्या
 • एका पीडित मुलीच्या तक्रारीवरुन दुपारी खामगाव पोलिसांनी गुन्हे दाखल
 • खामगाव पोलिसांनी आतापर्यत 16 जणांना ताब्यात घेतलंय
 • सर्वच्या सर्व आश्रमशाळेचे कर्मचारी,अधिकारी
 • या सर्वांची चौकशी सुरू
 • चौकशीनंतर 7 जणांना अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Buldhana, Khamgao, Rape, आदिवासी आश्रमशाळा, खामगाव, नवाब मलिक, निनाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळा, बुलडाणा

पुढील बातम्या