26 मार्च : धुळे जिल्ह्याच्या मुकटी गावात एक भीषण अपघात झाला. यात दोन लहान मुलांसह 4 जणांचा मृत्यू झाला.खड्डा चुकवण्याच्या नादात सुमो आणि ट्रकची धडक झाली.
हे सर्व जण गुजरातमधल्या सुरतचे होते.साखरपुड्यासाठी ते पारोळ्याला जात होते. 22 वर्षांची फरजाना बानो सिद्दी, 12 वर्षांची सुमय्या आणि 6 वर्षांच्या फरहाद यांचा यात मृत्यू झालाय.
या अपघातानंतर मुकटी गावातल्या लोकांनी आंदोलन केलं.खड्ड्यांमुळे या रस्त्यांवर लोकांचा इथे वारंवार जीव जातो पण प्रशासन काहीच करत नाही, असा गावकऱ्यांचा संताप आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.